प्रा. डॉ. विठ्ठल चौथाले यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / येणापूर  :
शासनाच्या शालेय  शिक्षण व क्रिडा विभागाने आज २८ ऑगस्ट रोजी परीपत्रक काढून  २०१८-१९ या वर्षातील
राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार  जाहीर केले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील चार शिक्षकांचा समावेश असून यामध्ये इंदिरा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विठ्ठल चौथाले यांचा समावेश आहे. 
प्राथमिक, माध्यमिक आणि विशेष शिक्षक, आदिवासी  विभागातील प्राथमिक शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षीका यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार  जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कारप्राप्त जिल्ह्यातील शिक्षकामध्ये प्राथमिक विभागातून  गडचिरोली पंचायत समिती अंतर्गत  येणाऱ्या अडपल्ली जिल्हा परिषद शाळेतील सहाय्यक शिक्षक प्रमोद धर्मराव खांडेकर यांचा समावेश आहे. माध्यमिक शिक्षकामध्ये  चामोर्शी तालुक्यातील येनापूर येथील इंदिरा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. डॉ. विठ्ठल लक्ष्मण चौथाले यांचा समावेश आहे. आदिवासी प्राथमिक शिक्षक विभागातून कुरखेडा तालुक्यातील पालापुंडी जिल्हा परीषद प्राथमिक शाळेचे सहाय्यक शिक्षक पुरंदर  रामचंद्र चौधरी,चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा माल जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळेतील सहाय्यक शिक्षक प्रभाकर पोचन्ना  आचेवार यांचा समावेश आहे. सदर पुरस्कार वितरण शिक्षकदिनी ५ सप्टेंबर रोजी मुंबई येथील रंगशारदा सभागृहात होणार आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-29


Related Photos