बोंड अळीचा प्रादुर्भावाणे शेतकऱ्यांत भीती : निंबोळी अर्क ,सापळ्याचा पुरवठा करण्याची गरज


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / खांबाडा :
कापूस पिकाच्या प्राथमिक अवस्थेत बोंड अळीचा प्रादुर्भाव  होत असल्याने  शेतकऱ्यात मोठी धास्ती निर्माण झाली आहे. तालुक्यातील बरेच  गावात कापूस पिकाच्या डोंब कळीवर गुलाबी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्यामुळे यावर्षी गुलाबी बोंड अळीचे संकट गडद होण्याची शक्यता टाळता येत नाही. 
 मागील वर्षी पासून बोंड अळी ने शेतकऱ्याचे तोंडचे पाणी पळविले आहे देशी वाणावर पडणाऱ्या अळ्या त्या बोन्डात  घुसल्या नंतर छिद्र दिसत होते मात्र बीटी कापसाच्या बोन्डा मध्ये वरून कोणतेही छिद्र दिसत नसल्याने शेतकऱ्याना त्याचा बंदोबस्त कसा करायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे.  शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे . 
 मात्र मागील वर्षी च्या हंगामातील बियाण्या मध्ये अळ्याना प्रतिरोधक जीन होते का या बाबत शेतकरी अज्ञात आहे.  चालू हंगामातील बियाण्या मध्ये बीटी  बियाण्या मध्ये अळ्याना प्रतिरोधक आहे किंवा नाही हे कृषी विभागा कडून पाहिल्या जात नसल्याने अळ्याची प्रतिकार शक्ती वाढली आहे. 
 या वर्षी सुद्धा परिसरातील  गावातील शेतं  शिवारातील कापूस पिकाच्या बोंड कळीवर गुलाबी अळीचा प्रादुर्भाव  झालेला आहे. या संदर्भात तालुका कृषी अधिकारी यांनी शेतशिवारातील कापूस पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना उपाययोजना सुचविल्या आहे. मात्र कृषी विभागाकडून अद्यापही कामगंध सापळे, निंबोळी अर्क यासारखी बोंड अळीच्या निर्मुलनासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा अनुदानावर पुरवठा करण्यात आलेला नाही. गरजेनुसार वेळीच कृषी विभागाकडून औषधांचा पुरवठा करण्यात आल्यास वेळीस शेतकऱ्यांना उपाययोजना करता येईल. मात्र प्रचार प्रसार आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे हे कृषी विभागापुढील आवाहन आहे. . 
कृषी विभागाकडून बोंड अळीच्या निर्मुलनासाठी प्रचार प्रसार करण्यात येत असला तरी शेतकऱ्यांकडून कृतीशिलतेचा अभाव दिसत आहे.एका शेतकऱ्यांनी शेतात सापळे लावले तरी दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातील बोंड अळीच्या पतंगाचा बंदोबस्त करणे जिकरीचे ठरत आहे.यामुळे सार्वत्रिक आणि एकात्मिक पद्धतीने बोंड अळीचे निर्मुलन करण्यासाठी सर्व स्थरातून मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. नाही तर पुन्हा बोण्ड अळी तोंडातला घास नेल्या शिवाय राहणार नाही यामूळे शेतकऱ्यां मध्ये धडकी भरली आहे  Print


News - Chandrapur | Posted : 2018-08-08


Related Photos