महत्वाच्या बातम्या

 आता पाच हजारापर्यंतचेच वीजबिल रोखीने भरता येणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने दिलेल्या आदेशान्वये लघुदाब कृषी वर्गवारीतील ग्राहक वगळता इतर सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांना वीज बिल रोखीने भरण्याची कमाल मर्यादा पाच हजार तर लघुदाब कृषी वर्गवारीतील ग्राहकांना ही मर्यादा दहा हजार रुपये करण्यात आली आहे.

त्यावरील रकमेच्या वीज बिलांचा रोखीने भरणा करण्यास निर्बंध लागू करण्यात आले आहे. हे निर्बंध १ ऑगस्टपासून लागू करण्यात येणार असून त्यानंतर कुठल्याही वीज ग्राहकाने या मर्यादेपलीकडील वीजबिलांचा भरणा केवळ ऑनलाईन पद्धतीनेच करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

विनामर्यादा वीज देयकाचा भरणा करण्यासाठी ग्राहक ऑनलाईन पध्दतीने महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही करु शकतो. हीर पध्दत अत्यंत सुरक्षित असून, ऑनलाईन वीजबिल भरल्यास दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये ०.२५ टक्के (जास्तीत जास्त ५०० रुपये) तर वीजबिलाचे प्रॉम्प्ट पेमेंट केल्यास १ टक्का असे एकूण १.२५ टक्के सुट वीजग्राहकांना देण्यात येते. विशेष म्हणजे क्रेडिट कार्ड वगळता उर्वरीत सर्व पर्यायांद्वारे ऑनलाईन पद्धतीने होणारा वीजबिलाचा भरणा निःशुल्क आहे. या प्रणालीची कार्यपध्दती महावितरणच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

लघुदाब ग्राहकांसाठी घरबसल्या एका क्लिकवर वीजबिल भरण्याची सुरक्षित व सोयीची ऑनलाइन सेवा उपलब्ध आहे. ऑनलाइनव्दारे वीजबिलांचा भरणा करणे अत्यंत सुरक्षित असून या पद्धतीस भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या पेमेंट व सेटलमेंट कायदा २०७७ च्या तरतुदी असल्याने पाच हजारापेक्षा अधिक रकमेचे वीजबिल रोखीने स्विकारण्यात येऊ नये अशा आशयाच्या सुचना सर्व वीज भरणा केंद्र, जिल्हा सहकारी बॅंकांना, सहकारी संस्था व पतपेढ़ी यांना महावितरणकडून देण्यात येत असून ग्राहकांनी देखील आपले वीजबिल ऑनलाईन पद्धतीने भरण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos