राज्यात ३ हजार २३७ उमेदवारांमध्ये केवळ २३५ महिला उमेदवार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
   विधानसभा निवडणूकीसाठी नामांकन भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता प्रचाराचा झंझावात सुरु आहे. मात्र निवडणूक लढविण्यात महिलांची संख्या नगण्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध राजकीय पक्ष व अपक्ष मिळून केवळ  २३५ महिला उमेदवार आहेत.
या निवडणुकीत एकूण ३  हजार २३७ उमेदवार असून यामध्ये  ३ हजार १  पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. चिंचवड मतदारसंघात जनहित लोकशाही पक्षामार्फत नितीश दगडू लोखंडे हे तृतीयपंथी उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-16


Related Photos