महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्हयात ३७ (१) (३) कलम लागू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : पोलीस अधिक्षक, गडचिरोली यांचे साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी महाशिवरात्री यात्रा उत्सव सुरु आहे. २१ फेब्रुवारी २०२३ पासून इयत्ता १२ वी ची परीक्षा सुरु होणार आहे. तसेच ०६ मार्च २०२३ रोजी जिल्हयात सर्वत्र होळी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. 

तसेच काही राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक हे धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा, मिरवणूक, सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडु नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्हयात २० फेब्रुवारी २०२३ चे ००.०१ वा ते दिनांक ०६ मार्च २०२३ चे २४.०० वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ चे कलम ३७(१)(३) संपूर्ण गडचिरोली जिल्हयात लागू करण्यात आले आहे. असे अतिरीक्त जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos