महत्वाच्या बातम्या

 जुनी पेन्शनच्या मागणी करिता विधान भवनांवर मोर्चा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची : नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावरती जुनी पेन्शन लागू करण्यात यावी यासाठी शिक्षक आरोग्य कर्मचारी वन कर्मचाऱ्यांचा पारडी पासून विधानभवनावर निघणाऱ्या मोर्चामध्ये नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील कर्मचारी मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी १२० कर्मचारी रवाना झालेले आहेत. अधिवेशनामध्ये प्रश्न उत्तराच्या तासामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शन लागू करता येणारच नाही अशी ठाम भूमिका घेतल्यामुळे सन २००५ पासून नोकरी करीत असलेले शिक्षक वन कर्मचारी महसूल कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी राज्य शासनावरती नाराज झाले असून देशातील इतर राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी तेथील सरकार सहमती दाखवतो. आणि महाराष्ट्रातील शिंदे आणि फडणवीस सरकार जुनी पेन्शन लागू करता येणारच नाही ही ठाम भूमिका घेतल्याने २००५ पासून कार्यरत असलेले कर्मचारी शासनाविरुद्ध नाराजी व्यक्त केलेली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos