अभियांत्रिकीचा पेपर देण्याकरिता पोहोचला दुसराच विद्यार्थी


-बीडी कॉलेजमध्ये उघडकीस आली घटना 
विदर्भ न्युज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
सेवाग्राम येथील बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात पेपर सोडवित असतांना एका फर्जी विद्यार्थ्यास पकडण्यात आले. ही घटना उघडकीस आली असता परीक्षा केंद्रावर खळबळ उडाली. याची तत्काळ सेवाग्राम पोलिसांना माहिती देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या  हिवाळी परीक्षा सध्या सुरू आहे. सेवाग्राम येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात अन्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत . शुक्रवार १६ नोव्हेंबर रोजी २ ते ५ या काळात विविध पाठयक्रमांच्या परीक्षा सुरू  होती. याच  दरम्यान बीई तृतीय सेमिस्टरचा फ्लूड मॅकनिकलचा पेपरही सुरू होता. पेपर सुरू झाल्यानंतर पर्यवेक्षक सगळया विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका व परीक्षेचे ओळखपत्र तपासत होते. तेव्हाच एका विद्यार्थ्याची हालचाल संदिग्ध आढळुन आली. याची बारकाईने तपासणी केली असता त्याचे जवळ मोबाईल असल्याची बाब  समोर आली. परीक्षेच्या दरम्यान मोबाईल जवळ बाळगणे गुन्हा आहे. असे असूनही मोबाईल आढळुन आल्याने मोबाईल घेऊन त्याची तपासणी करण्यात आली. यात मोबाईलमध्ये फोटो काढून अन्य मोबाईल नंबरवर पाठविण्यात आल्याची बाब समोर आली. सदर विद्यार्थ्याचा पेपरही दुसराच विद्यार्थी सोडवित असल्याचेही समोर आले. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या ओळखपत्रावर दुसऱ्याचा  फोटो स्कॅन करून लावण्यात आला होता. यानंतर त्याची प्रिन्ट काढण्यात आली होती. यामुळे पेपर सोडविण्याकरिता दुसऱ्यास विद्यार्थ्यास  पाठविण्यात आल्याची बाब  समोर आली.  रात्री उशीरा पर्यत सेवाग्राम पोलिस ठाण्यात कारवाईची प्रक्रिया सुरूच होती. तसेच विद्यार्थ्याचे नाव समोर येवु शकले नाही.  Print


News - Wardha | Posted : 2018-11-17


Related Photos