महत्वाच्या बातम्या

 तेलंगाणा राज्यासह चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील काही भागांत जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : तेलंगणा राज्यातील काही भागांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती उघडकीस आली आहे. भूकंपाची तीव्रता ३.१ रिष्टर स्केल होती. जमिनीच्या ५ कि.मी. आत हे धक्के बसल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

गोदावरी फॉल्ट परिसर भूकंपप्रवण भाग असल्याचे सांगितले जात आहे. मंगळवार २१ मार्च रोजी सकाळी ८:४२ वाजता तेलंगणा राज्यातील कागझनगरजवळील दहेगाव भागात हे भूकंपाचे धक्के जाणवले.

त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात व गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, अशी माहिती अभ्यासकांनी दिले आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी विनय गोडा यांना विचारणा केले, असता जिल्हा प्रशासनाकडे अजून तशी माहिती नाही. माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.  





  Print






News - Chandrapur




Related Photos