येडमपल्ली जवळ आढळले पोलिस पाटलाचे प्रेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 प्रतिनिधी / अहेरी  : 
तालुक्यातील कमलापूर ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या लिंगमपल्ली येथील पोलीस पाटील पूरात वाहुन गेल्याची घटना काल १८ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. रामय्या कुट्टी नेरला असे पूरात वाहून गेलेल्या पोलिस पाटलाचे नाव आहे. त्यांचे प्रेत आज सायंकाळी येडमपल्ली जवळ आढळून आले आहे. 
प्राप्त माहितीनुसार अहेरी उपविभागात रविवारी सायंकाळी मुसळधार पाऊस पडल्याने नदी नाल्यांना पूर आला. कमलापूर- रेपनपल्ली मार्गावर  कमलापूर पासून ३ अंतवरावर अंतरावर एक नाला आहे. या नाल्यावर पूल नसल्याने आलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी वाहत होता. दरम्यान नाला ओलांडत असतांना पाण्याच्या प्रवाहात रामय्या नेरला हे वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच कमलापूरच्या सरपंचा रजनीता मडावी यांनी तसेच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम सुरू केलीे. अखेर त्याचे प्रेत येडमपल्ली जवळ आढळून आले.   पाण्यात वाहुन गेलेल्याच्या नेरला कुटुंबीयांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच तालुक्यातील अतिदुर्गम भागातील नाल्यांवर तत्काळ पुलांची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी कमलापूरच्या सरपंचा रजनीता मडावी यांनी केली आहे. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-19


Related Photos