सहा हजारांची लाच स्वीकारताना विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपीक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर :
गैरहजेरीवरील रिकव्हरी माफ करण्यासाठी सहा हजारांची लाच स्वीकारताना नागपूर येथील नक्षल विरोधी अभियानाचे पोलिस महानिरीक्षक यांच्या  कार्यालयातील वरिष्ठ  लिपीकास अटक करण्यात आली आहे.
नंदकिशोर भाऊदास सोनकुसरे  (३२)  असे लाचखोर वरिष्ठ लिपीकाचे नाव आहे. तक्रारदार  हे जयवंत नगर रामेश्वरी रींग रोड नागपूर येथील रहीवासी असुन शासकीय नोकरी करतो. तक्रारदार अर्जित रजेवर असतांना त्याच्या आइची कीडनी खराब झाल्याने केअर हाॅस्पीटल नागपूर येथे औषधौपचार करिता भरती केले होते. अर्जित रजेवरून परत कर्तव्यावर  हजर होणे शक्य झाले नाही.  यामुळे तक्रारदार हे एकुण २२२ दिवस  गैरहजर होते.  त्यापैकी २६ दिवस रजा परावर्तित रजेत रूपांतरीत करण्यात आली. उर्वरीत एकुण १९७ दिवसाची रजा बिनपगारी करण्यात आली. यु.ओ.टी.सी. कॅम्पसमधील विषेष कृती दलाच्या
कार्यालयाचे रोखपाल नंदकिशोर भाऊदास सोनकुसरे यांनी फोनव्दारे तक्रारदाराला भेटायला बोलविले. तक्रारदाराने भेट दिली असता त्यांनी  ३७ हजार रूपये   गैरहजरबाबत  रीकव्हरी निघत आहे. सदर निघालेली रिकव्हरी पुर्ण माफ करण्याकरिता  १२ हजार रूपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर येथे तक्रार नोंदविली. तक्रारदाराने  दिलेल्या तक्रारीवरून आज १ नोव्हेंबर  रोजी सापळा कार्यवाहीचे  आयोजन केले असता सापळा कार्यवाही दरम्यान नंदकिशोर   सोनकुसरे यांनी  १२  हजार रूपये लाचेची मागणी करून पहिला हफ्ता म्हणुन ६ हजार रूपये लाच रक्कम स्विकारली. त्यावरून आरोपी विरूध्द्  पोलीस ठाणे वाडी नागपूर शहर येथे कलम ७ (अ) लाचलुचपत  प्रतिबंध (संशोधन) अधिनियम २०१८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
सदर कार्यवाही   पोलीस उपायुक्त/पोलीस अधिक्षक  पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुदलवार, यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक  मोनाली चौधरी , पोलीस निरीक्षक  भावना धुमाळे,  पोहवा सुनिल कंळबे, नापोशि रविकांत डहाट, प्रभाकर बले, लक्ष्मण परतेती सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर यांनी  केली आहे.

   Print


News - Nagpur | Posted : 2018-11-01


Related Photos