तब्बल ५५ तासानंतरही भामरागडवासीयांना पूर ओसरण्याची प्रतीक्षा


- आणखी ४ ते ५ तास लागण्याची शक्यता
- ताटकळलेले प्रवासी मार्ग मोकळा होण्याच्या प्रतीक्षेत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
शुक्रवारी दुपारी १२ वाजतापासून पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी चढले. तब्बल ५० ते ५५ तासांचा कालावधी लोटूनही हा पूर ओसरलेला नाही. यामुळे भामरागड वासीय अजूनही पूर ओसरण्याच्या प्रतीक्षेत असून अनेक प्रवासी ताटकळत पडले आहेत. भामरागडचा संपूर्ण जगाशी संपर्क तुलटलेला आहे. 
शुक्रवारी दुपारी १२ वाजतापासून पुर वाढत गेला. सायंकाळपर्यंत भामरागड शहरात पाणी शिरले. यामुळे अनेक नागरीकांच्या घरात तसेच दुकानांमध्ये पाणी शिरले. नागरीकांनी आपले साहित्य सुरक्षितस्थळी हलविल्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. संपूर्ण पुरपरिस्थितीवर महसूल व पोलिस प्रशासनाचे लक्ष आहे. अजूनही ४ ते ५ तासानंतर पूर ओसरण्याची शक्यता आहे. तहसीलदार कैलास अंडील व महसूल विभागाचे पथक तसेच भामरागड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदिप भांड तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-04


Related Photos