महत्वाच्या बातम्या

 जिल्ह्यातील २५ शेतकऱ्यांना परराज्यात अभ्यास दौऱ्यावर जाण्याची संधी


- अर्ज करण्याचे आवाहन आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२३-२४ अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्याबाहेर भेट हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात फलोत्पादन शेतकऱ्यासाठी तसेच शेतकऱ्यांमध्ये फलोत्पादन विषयक जिज्ञासा, आवड निर्माण करण्याच्या हेतूने तसेच फलोत्पादनाची प्रतवारी, हाताळणी, शेतस्तरावर करावयाची प्रक्रिया उद्योग व्यवसाय स्थापन करणे, फलोत्पादनाच्या विपणन व्यवस्थेबाबतचा अभ्यास करणे, आधुनिक लागवड तंत्रज्ञानाबाबत व काढणीपश्चात तंत्रज्ञानाबाबत सखोल शात्रोक्त ज्ञान उपलब्ध करुन देणे व या माध्यमातून शेतकऱ्यांनी स्वत:ची व त्याचबरोबर समूहाची फलोत्पादन विषयक शेती, उन्नत करणे याबाबीसाठी शेतकऱ्यांच्या राज्याबाहेर दौरा आयोजित करण्यात आला आहे.

या दौऱ्यात फळबाग, भाजीपाला, फुले लागवड, विदेशी फळपीक लागवड आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेता येईल, फळबाग लागवड, भाजीपाला लागवड, फुले लागवड करणाऱ्या, शेडनेटगृह व हरितगृह उभारणी, उभारणी, फळप्रक्रिया इत्यादी बाबत प्रशिक्षणासाठी सहभाग घेण्यास इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत संबंधित तालुका कृषि अधिकारी किंवा उपविभागीय कृषि अधिकारी यांचेकडे अर्ज, सातबारा, ८-अ, आधारकार्ड व छायाचित्रासह अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविंद्र मनोहरे यांनी केले आहे.

  Print


News - Nagpur
Related Photos