कुरखेडा - कोरची महामार्गाची दूरवस्था


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
सुरज हेमके / कोरची : 
कुरखेडा - कोरची मार्गे छत्तीसगड मध्ये जाणाऱ्या महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे.  या मार्गावरून नेहमीच छत्तीसगड मधील अतिजड वाहनांचे नियमांचे  उल्लघन करून सर्रासपणे वाहतूक सुरू असते. त्यामुळे हा मार्ग संपूर्ण मार्ग उखडला आहे. मार्गावर  ठीकठिकाणी मोठे - मोठे खड्डे पडले असून या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे . त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे .
 कुरखेडा - कोरची   छत्तीसगड मध्ये जाणारा हा मार्ग हा रायपुर पर्यंत  राज्य महामार्ग आहे. या मार्गावरून नियमांचे उल्लघन  करून छत्तीसगडमधील 
 अतिजड़ वाहने ;ट्रक  टीप्पर  यांची सर्रासपणे वाहतूक चालू असते. सर्व सरकारी वाहतूकीचे नियमांना धाब्बावर  बसवून ट्रक व टिप्पर  टोल टॅक्स वाचविनाच्या  उद्देशाने या मार्गावरून चालतात. याकडे गडचिरोली वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे. यामुळे या मार्गवर मोठ - मोठे खड्डे पडले आहेत .या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खड्डयांमुळे  त्रास सहन करवा लागत आहे . यामुळे अनेकांना  कमरेचा त्रास सुद्धा वाढला आहे. तसेच रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे अनेकदा अपघात होऊन प्रवाशांना जीवसुद्धा  गमवावा  लागला आहे. दुचाकी ,  कार  यांचे चेसीस रोड ला लागत असल्यामुळे पेट्रोल  डिजेल टॅंक फुटन्याच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत.  प्रशासनाने याकडे लक्ष घालून या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी , अशी मागणी या परीसरातील नागरिकांनी केली आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-02


Related Photos