महत्वाच्या बातम्या

 विविध गुन्ह्रात पाहिजे असलेल्या एका कट्टर जनमिलिशियास गडचिरोली पोलीसांनी केली अटक


- महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण १.५ लाख रुपयांचे बक्षीस.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : माहे फेब्राुवारी ते माहे मे दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ च्या दरम्यान पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका कट्टर जनमिलिशियास २१ एप्रिल २०२४ रोजी अटक केले.

२१ एप्रिल २०२४ रोजी उपविभाग भामरागड हद्दीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड यांना, भामरागड गावात एक संशयित व्यक्ती वावरत असतांना आढळुन आल्याने त्याची अधिक सखोल चौकशी असता, त्याचे दिलीप मोतीराम पेंदाम (३४) रा. नेलगुंडा, तह. भामरागड, जि. गडचिरोली असे असून, तो कट्टर माओवादी समर्थक व माओवाद्यांचे काम करणारा असल्याचे तसेच २२ मार्च २०२३ रोजी नेलगुंडा जंगल परिसरात ०१ क्लेमोर व ०२ कुकर बॉम स्फोटके लावुन सुरक्षा दलाच्या जवानांना जिवे ठार मारुन त्यांची शस्त्रास्त्र व दारुगोळा लुटण्याचे अनुषंगाने उप-पोस्टे लाहेरी येथे दाखल अप. क्र. ०१/२०२३ कलम ३०७, ३५३, ३४१, १४३, १४७, १४८, १४९, १२० (ब) भादवि, सह कलम ४, ५ भास्फोका, वाढीवकलम कलम १३, १६, १८, २०, २३, ३८, ३९ युएपीए ॲक्ट मध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास काल २१ एप्रिल २०२४ रोजी सदर गुन्ह्रात अटक करण्यात आली. अधिक तपासात असे दिसून आले की, या आधीसुद्धा माओवादी कारवायांमध्ये माओवाद्यांना मदत तसेच माओवाद्यांना राशन पुरवणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, गैर कायदयाची मंडळी जमवुन पोलीसांविरुध्द कट रचने, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे तो करीत होता.

अटक जनमिलिशिया आरोपीची माहिती - 
१) दिलीप मोतीराम पेंदाम
- कार्यकाळात केलेले गुन्हे - ०१
- सन २०२३ मध्ये नेलगुंडा जंगल परिसरात नेलगुंडा- गोंगवाडा व नेलगुंडा- महाकापाडी जाणा­या पायवाटेवर ०१ क्लेमोर व ०२ कुकुर बॉम स्फोटके पुरुन ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. व माओवादयांच्या हिंसक कार्यवायांच्या अनुषंगाने इतर दाखल गुन्हयात त्याचा प्रत्यक्षरित्या सहभाग होता.
- शासनाने जाहिर केलेले बक्षीस.
- महाराष्ट्र शासनाने दिलीप मोतीराम पेंदाम याच्या अटकेवर १.५ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकुण ७८ माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी एम. रमेश यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते यांच्या नेतृत्वात पार पडली. तसेच पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos