कर्जबाजारी महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास शक्य नाही : राम नेवले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा :
  कर्जबाजारी महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास शक्य नाही.  विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी वेगळा विदर्भ राज्य एकमेव पर्याय असल्याचे प्रतिपादन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी केले. 
 विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने वेगळा विदर्भ राज्य निर्मितीसाठी जनजागृतीसाठी २ जानेवारी पासून संपूर्ण विदर्भात सुरू असलेल्या विदर्भ निर्माण यात्रेच्या निमित्याने सोमवारी कुरखेडा येथे आयोजित सभेला मार्गदर्शन करताना नेवले बोलत होते.  विकासाचा नावावर शासनकर्त्यांनी राज्याला कर्जबाजारी बनविले आज राज्यावर आठ लाख अकरा हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.  परडोई बासष्ट हजाराचे प्रत्येक नागरिकांवर कर्ज आहे .  पगार करायची सोय नाही म्हणून राज्य सरकारने नौकर भरती बंद केली आहे.  आपण महाराष्ट्रात राहिलो तर येथील तरुणांना नोकऱ्या मिळणार नाही.  शेतीचे सिंचन वाढणार नाही विजेचे दर सतत वाढत राहतील.   परंतु वेगळा विदर्भ राज्य झाल्यास  अकरा जिल्ह्याचे तीस जिल्हे होतील संपूर्ण विदर्भाचा संतुलित विकास झपाट्याने होईल . छत्तीसगड,झारखंड या सारख्या छोट्या राज्याचा विकास झाला.  त्याप्रमाणे विदर्भाचा विकास शक्य असल्याने नागरिकांनी आंदोनात सहभागी होऊन येत्या निवडणुकीत भाजपा सरकारला पाच राज्यातील जनतेने जसा धडा शिकवला तसाच विदर्भातील जनतेने निवडणुकीत आंदोलन समजून धडा शिकविण्यासाठी पुढाकार घेण्याचे नेवले यांनी  आवाहन केले. 
 याप्रसंगी, माजी राज्यमंत्री रमेश गजबे,समितीचे कोर कमिटी सदस्य अरुण केदार,गुलाबराव महाराज राठोड,विष्णू आष्टीकर, भंडारा जिल्हाधक्ष्य देविदास लांजेवार, नागपूर जिल्हा उपाध्यक्ष विजय मोहदेकर,विनोद भामरे,मुकेश मसुरकर,सुरेश बारसागडे ,पौर्णिमा भिलावे आदींनी सुद्धा सभेला संबोधित करत स्वतंत्र विदर्भाची हाक दिली.  यावेळी मंचावर अभुदय कोसे, सौरभ गभने,मीना भोयर,पाणी पुरवठा सभापती अनिता बोरकर,मुक्ताजी दुर्गे,किसनलाल सहाला उपस्थित होते.   कार्यक्रमाचे  संचालन घनश्याम सहारे यांनी प्रास्तविक तालुकाध्यक्ष गणपत सोनकुसरे तर जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकूर यांनी आभार मानले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-08


Related Photos