देशात ३१ हजारापेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णांची नोंद


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : कोरोनाचे संकट कमी होताना दिसत नाही. देशात गुरुवारी 31,923 नवीन कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या 3,35,31,498 झाली आहे. तर सक्रिय रुग्णांत घट होऊन ती 3,01,604 झाली आहे. ही 187 दिवसांतील सर्वात कमी संख्या आहे. देशातील 31,923 नवीन रुग्णांपैकी 282 जणांचा मृत्यू झाला. तर केरळ राज्यामध्ये 19,675 नवीन रुग्ण सापडले असून 142 रुग्णांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये 282 जणांचा मृत्यू झालाय. यासह कोविड -19च्या एकूण मृत्यूची संख्या 4,46,050 वर गेली आहे. देशव्यापी कोविड -19 लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात आतापर्यंत 83.39 कोटींपेक्षा जास्त डोस पूर्ण करण्यात आले आहेत. भारतात बुधवारी 26,964 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोना बाधितांची एकूण संख्या 3,35,31,498 झाली आहे, तर सक्रिय प्रकरणे घटून 3,01,989 झाली आहेत. ही 186 दिवसातील सर्वात कमी वाढ आहे. बुधवारी सकाळी 8 वाजता जारी करण्यात आलेल्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 383 नवीन मृत्यूंसह मृतांची संख्या 4,45,768 वर पोहोचली आहे.
सक्रिय रुग्णांमध्ये एकूण संक्रमणाच्या 0.90 टक्के समावेश आहे, जो मार्च 2020 नंतर सर्वात कमी आहे, तर राष्ट्रीय कोविड -19 पुनर्प्राप्ती दर 97.77 टक्के नोंदवला गेला आहे, जो मार्च 2020 नंतर सर्वाधिक आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्यात बुधवारी दिवसभरात 4 हजार 285 जण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत राज्यात 63 लाख 49 हजार 29 करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.21 टक्के एवढे झाले आहे. तसेच आज राज्यात 3 हजार 608 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 48 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या एकूण 39 हजार 984 करोना बाधित रुग्ण आहेत.
News - World | Posted : 2021-09-23