महत्वाच्या बातम्या

 शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी कोरची येथे शैक्षणिक स्पर्धात्मक कार्यक्रम संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : छत्तीसगड सीमेला लागून असणाऱ्या कोरची येथे शिक्षण विभाग कोरचीच्या वतीने 7 व 8 फेब्रुवारीला 5 वी व 8 च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती उद्बोधन वर्ग व 9 फेब्रुवारी 2023 ला तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.चहारे   प्राचार्य वनश्री महाविद्यालय कोरची, कार्यक्रमाचे उद्घाटक मनोज अग्रवाल अध्यक्ष कोरची काँग्रेस कमिटी संयोजक टेंभुर्णे गटशिक्षणाधिकारी कोरची, प्रा.मांडवे,बन्सोड, प्राचार्य ढोक, आ.शा.कोरची रूखमोडे ,बिसेन, प्रा.जितेंद्र विनायक कोरची, सुरज हेमके, पारवता विद्यालय कोरची, प्रा.दोनाडकर, कोरची तालुक्यातील पाचही केंद्रातील केंद्रप्रमुख रामटेके, किशोर बावणे, कवाडकर, आवारी, करंभे, मिरी, इत्यादी हजर होते. तसेच कोरची तालुक्यातील विज्ञान प्रर्दशनीस शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

तालुक्यात 7 व 8 फेब्रुवारीला पाचवी व आठवीला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे उद्बोधन गटसाधन केंद्र कोरची येथे घेण्यात आले. या ठिकाणी सर्व तालुक्यातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती उद्बोधन सत्राचा लाभ घेतला.

9 फेब्रुवारी व 10 फेब्रुवारीला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन वनश्री महाविद्यालय कोरची येथे करण्यात आले. या प्रदर्शनीत तालुक्यातील प्राथमिक 24 व शिक्षक व माध्यमिक 8 शिक्षक मॉडेल 9 आदिवासी प्राथ.गट 4 माध्यमिक गट 3 शाळांनी सहभाग घेतला. मनोज अग्रवाल अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी यांनी उद्घाटनीय भाषणामध्ये विज्ञान हा जिवनाचा भाग आहे. तालुक्यातील विद्यार्थी विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यमातून प्रगत करून राज्य पातळीवर विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक रूपात नेण्याचे आवाहन केले. कोरची तालुक्याचा नावलौकिक करावा असे आवाहन केले. चहारे यांनी अध्यक्षीय भाषणातून आपला कोरची तालुका शैक्षणिक बाबत समोर आहे, परंतु त्यांना विशेष मार्गदर्शनाची गरज आहे व ते आम्ही देत आहोत. असे त्यांनी अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन कू.सोनाली सोरते व रोशनी दाते तर आभार राकेश मोहुलै गटसाधन केंद्र कोरची यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता वाघमारे, आडे, शुक्ला, लिंगायत, मोहनकर, वाढणकर, सहारे, बावनकुळे व वनश्री महाविद्यालयातील सर्व कर्मचारी, यांनी विशेष सहकार्य केले.

  Print


News - Gadchiroli
Related Photos