महत्वाच्या बातम्या

 प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेच्या अर्जातील त्रुटीची पुर्तता करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील खनिज प्रत्यक्ष बाधित व अप्रत्यक्ष बाधित क्षेत्रामध्ये रोजगार निर्मितीसाठी भर देण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी एकूण ६४० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ११४ अर्ज पात्र झाले. उर्वरित ५२६ अर्जांमध्ये त्रृटी आहेत. संबधित अर्जदारांना त्रुटीची पुर्तता करण्यासाठी संधी देण्यात आली आहे. अशा अर्जदारांची यादी डॉ. बाबासाहेब आबेडकर सामाजिक न्यायभवन, श्रध्दानंद पेठ, नागपूर येथे उपल्बध करुन देण्यात आली आहे. याची पुर्तता २७ फेब्रवारीपर्यंत लाभार्थ्यांनी करावी, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण सुकेशिनी तेलगोटे यांनी आहे.

प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी जिल्हातील खनिज प्रत्यक्ष बाधीत व अप्रत्यक्ष बाधीत क्षेत्रातील, प्रथम अर्ज प्राप्त होणाऱ्या पात्र अर्जदारास प्रथम प्राधान्य तत्वानूसार चार चाकी हातगाडी, वजन काटा व प्लास्टीक खुर्ची १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे -

अर्जदार हा नागपूर जिल्हातील खनिजकर्म प्रत्यक्ष बाधीत (६६ टक्के) व अप्रत्यक्ष बाधीत (३४ टक्के) क्षेत्रातील रहीवासी असावा. मागील आर्थिक वर्षातील तहसीलदाराने निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला (उत्त्पन्न मर्यादा १ लाख पर्यंत), रहिवासी दाखला (तहसीलदार निर्गमित), आधारकार्ड झेराक्स प्रत (नागपूर जिल्हातील आवश्यक), रेशन कार्ड झेराक्स प्रत, विद्युत देयकाची झेराक्स प्रत आवश्यक आहे.

अधिक माहीतीसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण नागपूर येथे सपंर्क साधावा.





  Print






News - Nagpur




Related Photos