लोकसभा आता लवकरच हायटेक होणार; खासदारांसाठी अ‍ॅप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
लोकसभा आता लवकरच हायटेक होणार आहे. आता थेट खासदारांसाठी अ‍ॅप तयार करण्यात येणार आहे. एखादे विधेयक सभागृहात येण्यापूर्वी त्याबद्दल सर्व माहिती खासदारांना या अ‍ॅपद्वारे देण्यात येईल. तसंच यासाठी विषेश तज्ज्ञांची मदत घेतली जाईल, अशी माहिती लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी दिली. खासदारांना सभागृहात सादर केलेल्या विधेयकांच्या विविध बाबींची माहिती देण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जाईल. यामुळे सरकारकडून सभागृहात सादर करण्यात येणार असलेल्या विधेयकाची पार्श्वभूमी आणि तपशील अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात मदत होईल. लवकरच संसद सदस्यांच्या सोयीसाठी एक अ‍ॅप तयार केले जाईल, ज्यामुळे त्यांना वादविवादावेळी होण्यास मदत होईल. तंसच हे लक्ष्य साध्य करण्यासाठी दूरदर्शन अभिलेखागारही शोधले जातील, असंही ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे.
लोकसभा सचिवालयातील कामकाज लवकरच पेपरलेस केले जाईल, ज्यामुळे कोट्यावधी रुपयांची बचत होईल आणि कागदाचा वापर कमी होईल. इलेक्ट्रॉनिक व डिजिटल पद्धतींचा वापर करून सदस्यांना हार्ड कॉपी पाठविण्यास उशीर होणार नाही. सभासदांना संसदीय कागदपत्रांची ई-कॉपी किंवा हार्डकॉपी मिळण्याचा पर्याय देण्यात येईल, असंही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता लोकसभेचा कारभार आता ऑनलाईन होणार आहे.
  Print


News - World | Posted : 2019-08-11


Related Photos