गडचिरोली शहर धुळमुक्त होणार का ? : राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य


- रस्त्यावरील धुळ कमी करण्यास दररोज हजारो लिटर पाण्याचा उपव्यय
- अस्थापनांच्या फलकावर बसला धुळीचा मलमा, फलक झाले दिसेनासे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
शहरातुन अनेक महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. यामुळे शहरातील मुख्य मार्गावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असुन याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. रस्त्यावरील धुळीमुळे मुख्य मार्गालगत असलेल्या अस्थापनांचे फलकावर धुळीचा मलमा बसल्याने फलक सुध्दा दिसेनासे झाले आहे. तसेच शहरात औद्योगिक व्यवसाय नसतांनाही धुळीचा त्रास येथील नागरिकांना सोसावा लागत आहे.  
गेल्या कित्येक महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. काही मार्गावर एकाच बाजुने वाहतुक सुरू आहे तर काही मार्गावर दोन्ही बाजुच्या रस्त्याचे काम झाले आहे. नगरपालिकातर्फे सकाळच्या सुमारास रस्त्यावरील धुळ झाडल्या जाते परंतु रस्त्याच्या मध्यभागी असलेली धुळ रस्त्याच्या कडेला ठेवल्या गेल्याने जड वाहन तिथुन गेल्यास संपुर्ण धुळ उडत असते. याचा नाहक त्रास मागे असणाऱ्या वाहनधारकांना, नागरिकांना सोसावा लागत आहे. तसेच दररोज संध्याकाळी ४ ते ५ वाजाताच्या सुमारास रस्त्यावरील धुळ कमी करण्यासाठी टॅंकरव्दारे पाणी मारले जाते. यात दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होतांना दिसते. एकीकडे पाणी अडवा पाणी जिरवा, पाण्याचा काटकसरीने वापर करा, पाण्याचा अपव्यय होणार नाही याकरिता प्रत्येक नळाला तोटया असणे आवश्यक आहे अन्यथा करावाई होणार असे बोलल्या जाते तर इकडे रस्त्यावरील धुळ कमी करण्यास दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय केल्या जातो आहे. मात्र रस्तावरील धुळ कमी करण्यास इतर उपाययोजना आखण्यात संबधित विभाग व नगर पालिका अकार्यक्षम दिसून येत आहे. रस्त्यावरील संपुर्ण धुळ रस्त्यालगत असलेल्या अस्थापणे, टपरी, रूग्णालये,औषधलयात जात आहे, अस्थापनांचे फलक, किलोमिटर फलक दिसेनासे झाले तसेच झाडांच्या पानांचा रंग सुध्दा या रस्त्याच्या धुळीमुळे बदलला आहे. सदर समस्या अतिशय गंभीर असुन शहर धुळमुक्त होणार का असा सवाल नागकरिकांकडून होत आहे. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-03-08


Related Photos