महत्वाच्या बातम्या

 २ बुलेट ट्रेन नागपूर, हैदराबाद मार्गावर धावणार : ७ बुलेट ट्रेनसाठी १९ हजार ५९२ कोटींची तरतूद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : यंदाच्या अर्थसंकल्पात ७ बुलेट ट्रेनसाठी भरीव तरतूद करण्यात आली असून त्यातील २ राज्याला मिळणार आहेत. मुंबईहून नागपूर आणि मुंबईहून हैदराबादसाठी बुलेट ट्रेन असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला गती देण्यासाठी आधीच अर्थसंकल्पात तरतूद आहे. पण सर्व ७ बुलेट ट्रेनसाठी १९ हजार ५९२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या अपेक्षा आणि त्यांच्या सुविधांसाठी २०२३-२४ अर्थसंकल्पात रेल्वेसाठी १ लाख ४० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातील १३ हजार ५३९ कोटी राज्याला मिळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम गुजरातमध्ये प्रगतिपथावर सुरू आहे. मात्र, महाराष्ट्रात या प्रकल्पाचे काम महाविकास आघाडी सरकारच्या काळात रखडल्याचा आरोप शुक्रवारला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला होता.





  Print






News - Rajy




Related Photos