फुले महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / आष्टी : ज्ञानाच्या विविध क्षेत्रात प्रचंड बदल होत आहेत आणि ज्ञानाची विविध दालने आता महिलांकरता खुली झालेली आहेत. त्यामुळे महिलांनी आपल्या अस्तित्वाची नोंद प्रत्येक क्षेत्रात घेण्यासाठी उच्चशिक्षित होऊन स्वकर्तुत्वाने उत्तुंग भरारी घ्यावी ,असे प्रतिपादन प्रा. ज्योती बोबाटे यांनी केले. ते वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचलित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील विशाखा समिती व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या द्वारा आयोजित जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाला महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी येथील प्राचार्य डॉ. संजय फुलझेले अध्यक्षस्थानी होते.
यावेळी प्रा. डॉ. राजकुमार मुसणे, प्रा. डॉ. भारत पांडे, प्रा. डॉ. रवी शास्त्रकार, प्रा. डॉ. गणेश खुणे, प्रा. श्याम कोरडे, प्रा. रवी गजभिये आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. संजय फुलझेले यांनी विविध क्षेत्रात नेत्रदीपक कार्य करणाऱ्या महिलांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला. विद्यार्थिनीने आई, बहीन, पत्नी, मैत्रीण अशा नारी शक्तीचा महिमा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या उदाहरणाद्वारे स्पष्ट केला. कार्यक्रमाचे संचालन बीए तृतीय वर्षाची विद्यार्थिनी आचल मडावी हिने , तर प्रास्ताविक नेहा कावडे हिने तर आणि आभार शीतल पिरसिंगुलवार हिने मानले.
News - Gadchiroli