महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२ मे महत्वाच्या घटना

१९०८ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमधे प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला.

१९१८ : जनरल मोटर्सने शेवरले मोटर कंपनी विकत घेतली.

१९२१ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू बाबाराव व तात्याराव यांची अंदमानातुन हिन्दुस्थानात पाठवणी केली.

१९४५ : दुसरे महायुद्ध – सोविएत सैन्याने बर्लिनचा पाडाव केला.

१९९४ : बँक ऑफ कराड चे बँक ऑफ इंडिया मधे विलिनीकरण झाले.

१९९४ : नगर जिल्ह्यातील रामदास ढमाले या अपंग युवकाने पुण्यातील टिळक तलावात सलग ३७ तास ४५ मिनिटे पोहून एक नवा विक्रम प्रस्थापित केला.

१९९७ : टोनी ब्लेअर इंग्लंडचे पंतप्रधान बनले.

१९९७ : राष्ट्रीय अ बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या अभिजित कुंटेने इंटरनॅशनल मास्टर किताबासाठीचे निकष पूर्ण केले.

१९९९ : कोल्हापूर येथील शर्वरी मानसिंग पवार या तीन वर्षे चार महिन्याच्या बालिकेने ५१.१ कि. मी. अंतर न थांबता स्केटिंग करुन ३ तास ५१ मिनिटांत पार केले.

१९९९ : मीरा मोस्कोसो पनामा देशाच्या अध्यक्ष म्हणून निवडलेल्या पहिल्या महिला ठरल्या.

२००४ : एस. राजेन्द्रबाबू यांनी भारताचे ३४वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

२०११ : अमेरिकन सैन्याच्या Navy Seals 6 या विशेष तुकडीने ओसामा बिन लादेन याची पाकिस्तानातील अ‍ॅबोटाबाद येथे हत्या केली.

२०१२ : नॉर्वेजियन चित्रकार एडवर्ड माँच यांचे द स्क्रीम हे चित्र लिलावात १२० मिलियन डॉलर्सला विकले गेले. हा एक नवा जागतिक विक्रम बनला.

२ मे जन्म

१८९९ : मराठी चित्रपटसृष्टी चे चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ नोव्हेंबर १९९४)

१९२० : शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९८३)

१९२१ : ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि भारतरत्‍न तसेच विशेष ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १९९२)

१९२९ : भूतानचे राजे जिग्मे दोरजी वांगचुकयांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै १९७२)

१९६९ : वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू ब्रायन लारा यांचा जन्म.

१९७२ : स्काईप सॉफ्टवेअर चे सहनिर्माते अहटी हेनला यांचा जन्म.

१९९१ : भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे महासंचालक - पद्म भूषण बी. बी. लाल याचं जन्म (मृत्यू : १० सप्टेंबर २०२२)

१८९२ : जर्मन लढाऊ पायलट, ज्यांना ८० हवाई लढाऊ विजयांचे अधिकृतपणे श्रेय दिले जाते ते मॅनफ्रेड फॉन रिचथोफेन (द रेड बॅरन) याचं जन्म (मृत्यू : २१ एप्रिल १९१८)

१३६० : मिंग साम्राज्याचे सम्राट योंगले यांचा जन्म (मृत्यू : १२ ऑगस्ट १४२४)

२ मे मृत्यू

१५१९ : इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ लिओनार्डो दा विंची यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १४५२)

१६८३ : शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरुन राज्यव्यवहारकोश तयार करणारे मुत्सद्दी रघुनाथ नारायण हणमंते तथा रघुनाथपंडित यांचे निधन.

१९६३ : महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य डॉ. के. बी. लेले यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर १८८२)

१९७३ : लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक दिनकर केशव तथा दि. के. बेडेकर यांचे निधन. (जन्म: ८ जून १९१०)

१९७५ : चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी व गीतकार शांताराम आठवले यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९१०)

१९९८ : गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते, ५व्या लोकसभेचे सदस्य पुरुषोत्तम काकोडकर यांचे निधन. (जन्म: १८ मे १९१३)

१९९९ : जयपूर-अत्रौली घराण्याचे शास्त्रीय गायक पं. सुधाकरबुवा डिग्रजकर यांचे निधन.

२०११ : अल कायदा चे संस्थापक ओसामा बिन लादेन अमेरिकन सैन्याने ठार मारले. (जन्म: १० मार्च १९५७)

१९६४ : संसद सदस्य (एमपी) म्हणून निवडून आल्यानंतर युनायटेड किंगडमच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बोलणाऱ्या पहिल्या महिला नॅन्सी एस्टर यांचे निधन (जन्म: १९ मे १८७९)





  Print






News - todayspecialdays




Related Photos