पतीने केली पत्नीची गळा आवळून हत्या, भांडूप येथील घटना


पतीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन दिली खुनाची कबुली
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
भांडूप येथील हनुमान नगरमध्ये चारित्र्यावर संशय घेत २२ वर्षीय पतीने १९ वर्षीय पत्नीची हत्या केल्याची घटना काल ३१ ऑक्टोबर रोजी घडली.  या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. आरोपी पतीचे नाव अमर महिरे असे असून मृत पत्नीचे नाव शिवानी महिरे आहे. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी पती स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन त्याने खुनाची कबुली दिली आहे. 
शिवानीला वारंवार एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून फोन येत असे. काल सकाळी ८. ३० वाजताच्या सुमारास असाच फोन शिवानीला आला. त्यानंतर अमर तिला कोणाचा फोन आला विचारलं असता तिने मैत्रिणीचा फोन असल्याचं सांगितलं. मात्र, ती मित्राशी बोलत असल्याचं उघड झाल्यानंतर चिडलेल्या अमरने कपडे वाळत घालण्याची दोरीने गळा आवळा. गळा आवळल्याने शिवनी जागीच मरण पावली. त्यानंतर घरात मयत पत्नीला ठेवून, घराला टाळ लावून काल संपूर्ण दिवसभर अमर कांजूरमार्ग परिसर फिरत होता. शेवटी त्याने काल रात्री १०.३० वाजताच्या सुमारास विक्रोळीतील पार्क साईट पोलीस ठाण्यात जाऊन केलेल्या हत्येची कबुली दिली. त्यानंतर पार्कसाईट पोलिसांनी अमरला भांडुप पोलिसांच्या हवाली केले. भांडुप पोलिसांनी घरातील शिवनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.   Print


News - Rajy | Posted : 2018-11-01


Related Photos