चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांचा झुंजीत वाघ - वाघीणीचा मृत्यू
- जिल्ह्यात पंधरा दिवसात चार वाघाचे मृत्यू
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांचा झुंजीत वाघ वाघीण चे मृत्यू झाल्याची घटना २२ जानेवारी ला उघडकीस आली.
२२ जानेवारी ला सकाळी कोळसा वनपरिक्षेत्र, नियतक्षेत्र संगम, उपक्षेत्र झरी कक्ष क्र. ३३८ पानघाट कुटी परिसरातील खातोडा तलाव क्षेत्रात वनरक्षकास गस्ती दरम्यान दोन वाघांचे मृतदेह आढळुन आले.
एका वाघाचे पृष्ठभागाकडून दुस-या वाघाने अंशता मांस भक्षण केलेले दिसले. पूर्णपणे शाबुत असलेला वाघ हा टी - १४२ नर असुन अंदाजे वय ६ - ७ वर्षे आहे. कमी वयाचा दुसरा वाघ हा टी - ९२ या वाघीणीचा मादी बच्चा आहे, अंदाजे वय २ वर्षे आहे. २० - २१ जानेवारी चे रात्री झालेल्या वाघाच्या झुंजीत सदरील दोन वाघांचा मृत्यु झाल्याचा कयास आहे. परिसराची कॅमेरा ट्रॅपच्या द्वारे अधीक माहिती गोळा करण्यात येत आहे.
वाघाचे मृतदेह टीटीसी चंद्रपुर येथे पाठविले आहे. २३ जानेवारी रोजी सकाळी टीटीसी चंद्रपुर शवविच्छेदना दरम्यान मृत्युचे नेमके कारण काय? त्यांचा अंदाज येईन, नमुने डीएनए चाचणी करीता प्रयोगशाळेत पाठविण्याची तजवीज ठेवण्यात येत आहे.
मौका पंचनामा करते वेळी नंदकिशोर काळे उपसंचालक (कोर), वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव), कोळसा रुदंन कातकर व बंडु धोतरे, एनटीसीए प्रतिनिधी व डब्लूपीएसआय चे मुकेश बांधककर, वन्यजीव संशोधक क्रीष्णन डब्लूआयआय, ताडोबाचे वन्यजीव पशुवैद्यकिय अधिकारी खोब्रागडे व जीवशास्त्रज्ञ यशस्वी राव व क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते.
News - Chandrapur