महत्वाच्या बातम्या

 डॉ. श्वेता वाळके (गेडाम) यांचे निशुल्क सेवा दिल्याबद्दल सत्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर येथील डॉ. श्वेता वाळके (गेडाम) यांचे निशुल्क सेवा व उत्कृष्ट कामगीरी केल्या बद्दल सत्कार करण्यात आले.

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय चंद्रपूर तसेच प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान अंतर्गत चंद्र‌पूर जिल्हातील ग्रामिण व उपरुग्णालयातील स्त्रीरोगतज्ञ म्हणून निशुल्क सेवा दिल्याबद्दल चंद्रपूर येथील सिद्धार्थ हॉटेल मध्ये २६ मार्च रोजी चंद्रपूर वैद्यकिय महाविद्यालय चे डिन डॉ.  कांबळे, जिल्ह शल्य चिकित्सक सर्जन डॉ. चिंचोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कठाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. भास्कर सोनारकर, स्त्रीरोग तज्ञ  (असोशिएट) डॉ सौ. घाटे यांच्या उपस्थितीत डॉ. श्वेता वाळके (गेडाम) यांचे निशुल्क सेवा व उत्कृष्ट कामगीरीकेल्या बद्दल मानचिन्ह तसेच सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथील सर्व वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर्स, कर्मचारीवृद मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच अन्य स्त्रीरोग तज्ञ यांचाही सत्कार करण्यात आला. सर्वांनी सत्कार मूर्तीचे भरभरून कौतुक केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos