चक विरखल येथील गुराख्यावर वाघाचा हल्ला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / पाथरी (सावली) :
सावली तालुक्यातील चक विरखल येथील युवक नेहमी प्रमाणे गुरे चराईकरिता गेला असता त्याच्यावर पट्टेदार वाघाने हल्ला करून जखमी केले. 
सावली तालुक्यातील पाथरी वनविभाग  हद्दीत येत असलेल्या नवेगाव बिट येथील कक्ष क्रमांक १६५ येथे मिथुन मारोती मुत्तेलवार (१८) वर्षे रा. चक विरखल नेहमी प्रमाणे गुरे चारत होता. रविवार १९ नोव्हेंबर रोजी ४.३० वाजताच्या दरम्यान दबा धरून बसून असलेल्या  पट्टेदार वाघाने त्याच्यावर हल्ला चढविला असता त्याने जोर जोराने ओरडल्याने तो वाघ तिथून पळाला.  या दरम्यान त्याला  जखमा झाल्या व त्याचा जीव वाचला.  त्याला गडचिरोली ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.  या दरम्यान पाथरी येथील वन अधिकारी ग्रामीण रुग्णालय गाठून त्याला तात्पुरती मदत करण्यात आली. यात पाथरी चे आर.एफ.ओ. जांगीडवार, वनरक्षक पी.एस. मलांडे, वनपाल वाय.एस. नान्हे, पाडवी, गेडाम उपस्थित होते. 



  Print






News - Chandrapur | Posted : 2018-11-19






Related Photos