महत्वाच्या बातम्या

 ३१ मार्चपर्यंत दररोज बँका सुरू राहणार : आरबीआयचे निर्देश


- रविवारची सुट्टीही रद्द

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ समाप्त होण्यासाठी आता अवघा आठवडा राहिला आहे. १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होईल. मार्च महिन्यात संपूर्ण आर्थिक वर्षातील व्यवहारांचा लेखाजोखा तपासला जातो.

त्यानंतर अनेक व्यवहारांचा वार्षिक ताळेबंद पूर्ण केला जातो. त्यामुळे मार्च महिना हा बँक कर्मचाऱ्यांसाठी सर्वाधिक कामाचा महिना मानला जातो. या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत सर्व बँकांचे व्यवहार दररोज सुरू ठेवण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.

अर्थात या दिवसांमध्ये ग्राहकांच्या व्यवहारांसाठी बँक उपलब्ध असणार नाही. फक्त चेक जमा करणे आणि ऑनलाईन बँकिंग या सुविधा उपलब्ध असतील. रविवारीही बँकांचे व्यवहार सुरू ठेवण्यात येणार आहेत. सर्व बँकांना एका परिपत्रकाद्वारे आरबीआयने असे, आदेश दिले आहे. या काळात सरकारी व्यवहारांसाठी सगळे दिवस बँका सुरू राहतील.

एनईएफटी आणि आरटीजीएसच्या माध्यमातून ३१ मार्च २०२३ च्या मध्यरात्री १२ पर्यंत हे व्यवहार सुरू राहणार आहेत. त्यानंतर १ एप्रिल आणि २ एप्रिल रोजी बँकांमध्ये कामकाज बंद राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.





  Print






News - Rajy




Related Photos