महत्वाच्या बातम्या

 भामरागड येथे आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शिक्षकांचे प्रशिक्षण संपन्न 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भामरागड : तालुक्यातील आदिवासी विकास विभाग, प्रकल्प कार्यालयालातर्फे ताडगाव केंद्राचे शैक्षणिक गुणवत्ता कक्ष (E.R.C.) अंतर्गत शिक्षकांचे दोन दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले. भगवंतराव प्राथमिक आश्रम शाळा तथा जय पेरसापेन माध्यमिक आश्रमशाळा भामरागड येथे २३ व २४ फेब्रुवारी २०२३ रोजी पार पडलेल्या शिक्षकांच्या प्रशिक्षणात इयत्ता १ ते ७ वीला शिकविणारे ४२ शिक्षक उपस्थित होते. प्रशिक्षणात जीमेल आयडी तयार कशी करायची, मेल कसे पाठवायचे, मेलला उत्तर देणे. तसेच गुगल ड्राईव्हवर फोल्डर तयार कसे करायचे, ड्राइव्हवर फोटो, फाईल अपलोड कसे करायचे, फोल्डर शेअर करणे.

शेवटच्या सत्रात माझे शैक्षणिक प्रयोग यामध्ये शिक्षकांनी राबविलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती देवून त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर प्रशिक्षणाला सहाय्यक प्रकल्प अधिकारी कु. रोशना चव्हाण यांनी वेळोवेळी भेट देऊन उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. मार्गदर्शक प्रशिक्षक म्हणून शैक्षणिक गुणवत्ता कक्षाचे विषयमित्र एम. आर. शेंडे व एन.व्ही. कळंब यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी के. जी. ऊसेंडी पूर्ण वेळ उपस्थित होते. मुख्याध्यापक गोटे सर, सय्यद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos