महत्वाच्या बातम्या

 विविध कौशल्य आत्मसात केल्याने विकासास गती : महाज्योती संचालक राजेश खवले


- महाज्योती तर्फे ग्रेस एज्यूनेट येथील प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मावळ्यांना त्यांच्या कौशल्यानुसार कार्य करण्याची संधी दिली आणि त्यातून स्वराज्य उभे राहिले. त्यामुळे वेगवेगळी कौशल्य आपण आत्मसात केली पाहिजे. अनेक प्रकारचे न्यूनगंड बाळगल्याने व्यक्तीची प्रगती थांबते, त्यासाठी या न्यूनगंडांवर मात केले पाहिजे, असे महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी सांगितले. महाज्योती मार्फत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

महाज्योती नागपूर प्रायोजित ग्रेस एज्यूनेट या संस्थेमार्फत देण्यात आलेले प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय, पुसद येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये खवले यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

आज विविध क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत आणि महाज्योती त्यासाठी प्रशिक्षण देऊन रोजगार निर्माण करीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आवश्यक त्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खवले यांनी केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय, पुसद येथील प्राचार्य डॉ. अविनाश वानखेडे होते. त्यांनी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या प्रसंगी संगणक विभाग प्रमुख डॉ. सुरेश आसवले, समाज शास्त्र विभाग प्रमुख रूचिर गोडबोले व महाज्योतीचे प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे, ग्रेस एज्यूनेट संस्थेचे संचालक विनोद कापसे, उपसंचालक आशिष फुळमाली व व्यवस्थापक संदीप नांदेडकर यावेळी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेकॅनिकल विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप दुधाट यांनी केले.





  Print






News - Nagpur




Related Photos