महत्वाच्या बातम्या

 रानडुक्कराच्या झुंडने केली पिकाची नुकसान


- शेतकऱ्यांना कापूस पिकाचा नुकसानी फटका

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : तालुक्यातील पिपरी गावात रानडुक्कर झुंडने शेतातील कापूस पिकाची नुकसान केली आहे. शेतावर वारंवार होत असलेल्या हल्ल्यामुळे गावातील शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. सदरबाबतीत शेतकऱ्यानी ना. सुधीर मुनगंटीवार सांस्कृतिक व वनेमंत्री तथा पालकमंत्री यांचाकडे धाव घेतली व होत असलेल्या नुकसानी बाबत माहिती दिली. सदर माहितीच्या आधारावर पालकमंत्री यांनी वनविभाग अधिकाऱ्यांना निरीक्षणाकरिता 26 ऑक्टोबरला माजी समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांचा सह गाव शेतीची पाहणी करण्यास धाडले. पाहणीकरिता वनविभागाचे वनरक्षक पात्रे व गोदे यांची उपस्थिती होती. शेतीची पाहणी करण्यात आली तसेच नुकसान झालेल्या पिकाची नोंद करण्यात आली. 

यावेळी गावातील शेतकरी नागरिक राहुल चौधरी, अमोल मत्ते, शरद कंडे, प्रमोद कंडे, प्रमोद आमटे, विनोद खेवले यांची उपस्थिती होती. 

नुकसान झालेल्या पिकाची भरपाई शेतकऱ्याला मिळावी याकरिता ब्रिजभूषण पाझारे यांच्या मार्फत मागणी करण्यात आली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos