महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाही येथील सर्वोदय महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस संपन्न 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिंदेवाही : पूर्वीपासून मानव आणि विज्ञान यांचे नाते आहे. विज्ञानाच्या जोरावर मानवाने अनेक शोध लावले, २१ व्या शतकात तर विज्ञानाला पर्याय नाही. आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक आहेत. आणि भारत निर्माण करण्यासाठी त्यांचे योगदान हे महत्वाचे राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे काळाची गरज आहे. असे मत प्रा. डॉ. राजेश डहारे यांनी सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही येथे राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त व्यक्त केले.

सिंदेवाही येथील सर्वोदय महाविद्यालयात नवव्या वर्गातील विध्यार्थ्यांना वैज्ञानिक महत्त्व विशद करन्यासाठी महाविद्यालय राष्ट्रीय विज्ञान दिन आयोजित करण्यात आला. यामध्ये कल्पतरू विद्यामंदिर, सर्वोदय विद्यालय व सर्वोदय कन्या विद्यालयामधील मुले व मुली उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. डॉ राजेश डहारे , प्रा. डॉ. माधव वरभे, कल्पतरूच्या मुख्याध्यापिका शेख, माथुरकर , मंचावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी उदाहरण देवून सी.व्ही. रमन यांच्या बदल माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी स्वतःच प्रश्न उपस्थित करून विज्ञानिक माहिती मिळवून घ्यावी, कोणत्याही अंधश्रद्धेच्या आहारी न जाता प्रत्येक विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा,असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. उके यांनी केले. तसेच डॉ. विनय त्रिपदे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. महाविद्यालयात नवव्या वर्गातील विध्यार्थ्यांसाठी रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पती शास्त्र, पदार्थ विज्ञान व संगणक शास्त्र या प्रयोगशाळेत वेगवेगळे प्रयोग दाखवून विध्यार्थ्यांना वैज्ञानिक माहिती दिली. यामध्ये प्रा रुपा बोरकर, राहुल अगळे, तुकाराम बोरकर, नेहा वासनिक व प्रफुल्ल रणदिवे, चाकाटे, विनय खोब्रागडे, भरडकर, व ठीकरे यांनी मोलाचे योगदान दिले. विध्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रयोगशाळेत बि. एस. सी. च्या विध्यार्थ्यांनी प्रयोग समजावून सांगितले.





  Print






News - Chandrapur




Related Photos