महत्वाच्या बातम्या

 नगर परिषद बल्लारपूरमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : नगर परिषद बल्लारपूर येथे २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या संविधानातील मूलभूत मूल्यांचा जागर करण्यात आला.

या कार्यक्रमाला नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ, कार्यालय अधीक्षक सूरज वाघमारे, नगर अभियंता डॉली मदान, प्रशांत गणवीर, रचना सहाय्यक प्राप्ती मून, जागृती मेडपल्लीवार यांच्यासह नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेले अधिकार, कर्तव्ये आणि लोकशाही मूल्यांचे जतन करण्याची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. संविधानातील आदर्शांचे पालन करून देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. कार्यक्रमात नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.





  Print






Related Photos