गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार, अहेरी उपविभागात जनजीवन विस्कळीत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र पुरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अहेरी उपविभागातील जनजीवन विस्कळीत झाले असून भामरागडचा संपर्क तुटलेला आहे. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. 
मागील काही दिवसांपासून पावसामुळे हाहाकार माजविला आहे. आज २० आॅगस्ट रोजी सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत असून नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यातील नाले, नद्यांवरील पुलावर पाणी चढून मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. गडचिरोली शहारातील सखल भागात पाणी साचले आहे. शेतीची कामे ठप्प पडली आहेत. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतजमीन खरडून जाण्याचासुध्दा धोका आहे. जिल्ह्यातील अनेक मार्ग खड्डेमय असल्यामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अहेरी उपविभागातील अनेक छोट्या पुलांमुळे मार्ग बंद पडले आहेत. मुलचेरा तालुक्यातसुध्दा मार्गांची दुरवस्था आणि कमी उंचीच्या पुलांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आलापल्ली येथे मागील दोन दिवसात अनेक नागरिकांची घरे कोसळली. जिल्ह्यातील अनेक नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. अजूनही पावसाचा जोर कायम असून पुढील ४८ तासात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यामुळे जिल्ह्यात पुरपरिस्थिती  निर्माण होण्याचा धोका आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-20


Related Photos