महत्वाच्या बातम्या

 पोलीस खबऱ्या असल्याच्या आरोपावरून नक्षल्यांनीच केली नक्षल्याची हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील गर्देवाडा गावानजीक नक्षल्यांनी सहकारी नक्षल्याची गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दिलीप उर्फ नितेश गजू हिचामी (२६) असे मृत नक्षलीचे नाव असून, तो एटापल्ली येथील झुरी या गावचा रहिवासी आहे. नक्षल्यांमध्ये त्याला डाँक्टर म्हणून आळखले जायचे. 

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्रीनंतर नक्षल्यांनी दिलीप हिचामी यास गर्देवाडा गावाजवळच्या रस्त्यावर गोळी झाडून ठार केले. मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. दिलीप हिचामी हा २०११ मध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाच्या सांगण्यावरून नक्षल दलममध्ये सहभागी झाला होता. २०१२ मध्ये तो कसनसूर एलओएसचा पूर्णवेळ सदस्य म्हणून काम पाहत होता. सप्टेंबर २०२२ पर्यंत तो दलममध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडत होता. परंतु ऑक्टोबर महिन्यात दिलीपने पोलिसांच्या सांगण्यावरून नक्षल्यांच्या विभागीय समितीचा सदस्य शंकर राव उर्फ वाचम शिवा याची हत्या केली. ही हत्या चकमकीत झाल्याचा देखावा दिलीपने केला. परंतु तोच पोलिसांचा खबऱ्या होता. त्यामुळे त्याची हत्या करीत असल्याचे नक्षल्यांनी दिलीपच्या मृतदेहावर टाकलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. त्याचप्रमाणे एक पत्रक काढून २२ नोव्हेंबरला शंकर रावच्या स्मृतीत शोक दिवस पाळण्याचे आव्हानदेखील केले आहे. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos