गडचिरोली शहरातून राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुुरूवात, रस्त्यालगतची दुकाने हटविली


- अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत पहिल्या टप्प्यातील काम, ड्रेनेजचे खोदकाम सुरू
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
चंद्रपूर - गडचिरोली - मुरूमगाव या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गडचिरोली शहरातून प्रारंभ करण्यात आला आहे. यामुळे रस्त्यालगतची दुकाने हटविण्यात  आली आहेत. बसस्थानकापासून ड्रेनेजचे खोदकाम सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात बोदली येथील अभियांत्रिकी महाविद्यालापर्यंतचे काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
चंद्रपूर मार्गाचे काम पुलखल पर्यंत पोहचले आहे. त्यानंतर आता गडचिरोली शहरातून महामार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. रस्त्याचे काम करण्यापूर्वी दोन्ही बाजूस ड्रेनेजचे काम केले जाणार आहे. यानंतर महामार्गाच्या कामाला प्रारंभ होणार आहे. पाच फुट रूंद आणि पाच फुट खोल असे ड्रेनेज बांधले जाणार आहेत. यामुळे रस्त्यालगतचे अतिक्रमण दुकानदारांनी स्वतःहून आज काढले. यामुळे त्यांना आता पर्यायी जागा शोधावी लागणार आहे. राष्ट्रीय  महामार्ग गडचिरोली शहरातून २४ मीटरचा राहणार आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-24


Related Photos