गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एका कोरोनाबाधित रुग्णाची भर : रूग्णसंख्या पोहचली २६ वर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
कोरोना विषाणूने सर्वत्र धुमाकूळ माजवला आहे. ग्रीनझोन असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात कोरोना विषाणूने शिरकाव केल्यापासून दिवसागणित कोरोनाबाबधितांची संख्या वाढतच जात आहे. २४ मे रोजी रात्रो १०. ००  वाजता दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता काल २५ मे रोजी दुपारी ३. ०० वाजता नऊ जणांचा व रात्रो  ९. ०० वाजता पुन्हा एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या २५ वर पोहचली होती. आज २६ मे रोजी दुपारी १. ००  वाजता पुन्हा एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २६ वर पोहचली आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने  नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. आज दुपारी १. ००  वाजता आलेल्या अहवालानुसार नव्याने आढळलेला कोरोना पाॅझिटीव्ह रूग्ण हा मुलचेरा तालुक्यातील असून  तो मुंबई येथून आला होता. त्याला मुलचेरा येथील संस्थात्मक क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते असे आरोग्य विभागाने कळविले आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक कामे वगळता घराबाहेर न पडता घरीच सुरक्षित राहावे असे आवाहन गडचिरोली आरोग्य विभागाच्या वतीेने सातत्याने करण्यात येत  आहे.​
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-05-26


Related Photos