महत्वाच्या बातम्या

 शालेय पोषण आहारात चक्क प्लास्टिकचा तांदूळ : सोलापूर जिल्ह्यातील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / सोलापूर : आपण बाजारातून किंवा रेशन कार्डद्वारे आणलेल्या धान्यामध्ये खडे किंवा कचऱ्याची भेसळ पाहतो. धान्य शेतातून येत असल्याचे आपण गृहित धरुन सर्व धान्य साफ करतो. परंतु सोलापुर येथे शालेय पोषण आहाराच्या तांदळामध्ये चक्क प्लास्टिकचा तांदूळ आढळला असून सांगोला तालुक्यातील घेरडीच्या सरपंच सुरेखा पुकळे यांनी पुराव्यासह भेसळयुक्त तांदळाचा प्रकार उघडकीस आणला आहे.

माहितीनुसार जेव्हा रेशनमधील तांदूळ बघितल्यावर तांडळामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकची भेसळ असल्याचे आढळून आले. त्यामुळे गावातील दोन-तीन शाळेतील तांदूळ तपासन्यात आले. त्यावेळी देखील तांदळमध्ये प्लास्टिकची भेसळ असल्याचे आढळून आले. या भेसळयुक्त तांदळामुळे शाळकरी मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

विशेष म्हणजे शालेय पोषण आहारासह रेशनच्या दुकानांमध्ये देखील प्लास्टिकचा तांदूळ भेसळयुक्त असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे . 

परंतु सोलापूर जिल्ह्यात प्लास्टिकच्या तांदळाचा प्रकार उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अन्न व भेसळ विभागासह जिल्हा प्रशासनाकडून भेसळयुक्त तांदळाबाबत ठोस निर्णय होण्याची गरज असल्याचे मत सर्वसामान्यांकडून व्यक्त केले जात आहे. 





  Print






News - Rajy




Related Photos