गडचिरोली पोलिस दलातून १६ कर्मचाऱ्यांनी घेतला निरोप


- पोलिस मुख्यालयात कृतज्ञता सोहळा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: गडचिरोली जिल्हा पोलिस दलातून आज ३१ आॅक्टोबर रोजी १६ पोलिस कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. यानिमित्त पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक डाॅ. हरी बालाजी, पोलिस उपअधीक्षक प्रदिप चौगावकर यांच्या उपस्थितीत कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला.
सहाय्यक फौजदार हमीदखाॅ पिरमोहमदखाॅ पठाण, सहाय्यक फौजदार रमेश रूषी पत्रे, सहाय्यक फौजदार अरूण डोनूजी भसारकर, प्रमुख लिपीक दामोधर देवनाथ हेडाउ, नापोशि जयराम महादेव पेंदोर, सहाय्यक फौजदार जाज मेहमूद पठाण, सहाय्यक फौजदार विजतंत्री बाबासाहेब बापू सिरसाट, सहाय्यक फौजदार शरद प्रभाकर पोटवार, सहाय्यक फौजदार देवराव समय्या गुज्जावार, पोलिस हवालदार वायरलेस नरेश महादेवराव खोडवे, सहाय्यक फौजदार आर.एम. रंजित बापुरावजी बदर, सहाय्यक फौजदार अर्जून वारजु कन्नाके, सहाय्यक फौजदार भुपाल उपेंद्रनाथ बिश्वास, सहाय्यक फौजदार फत्तू आत्माराम अंडेलकर, सहाय्यक फौजदार मेठुराम तुळशिराम दुधबळे, सहाय्यक फौजदार दिवाकर मुकूंदराव शेबे यांचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये समावेश आहे.
कृतज्ञता सोहळ्यात कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र, रोपटे व भेटवस्तू देवून गौरव करण्यात आला. सेवानिवृत्त कर्मचारी यांनी आपल्या कार्यकाळातील अनुभव कथन केले. यानंतर पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे , अपर पोलिस अधीक्षक डाॅ.हरी बालाजी यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-31


Related Photos