महत्वाच्या बातम्या

  शिवराया स्पोर्ट क्लब कासवी यांचे वतीने शिवजयंती निमीत्य रक्तदान शिबिराचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / आरमोरी : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले कासवी येथील शिवराया स्पोर्ट क्लब यांनी शिवजयंती निमित्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले. या शिबीरात गावातील ४०-५० युवकांनी सहभाग नोंदवला.        

सायंकाळी गावातीलच यूवकांचे शिवरायांच्या चरित्रावर व्याख्यान व  सांस्कृतिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होते. कार्यक्रमांमध्ये शाळकरी मुलांनी आपल्या अंगातील कला गावकऱ्यांसमोर प्रस्तुत केली. आयोजकांनी त्यांचे रोख रकम व बक्षिस देऊंन सत्कार केला. नंतर ज्या रक्तदात्यानी रक्तदान केले अशा रक्तदात्याना पाहुण्यांचे हस्ते प्रमानपत्र व टी शर्ट चे वितरण करण्यात आले.

सदर अर्यक्रमाचे अध्यक्ष मणून सामाजीक कार्यकर्ता नंदू नाकतोडे, विशेष अतिथी माजी आरोग्य सभापती नगर परिषद आरमोरीचे भारतजी बावनथडे, उदाराम दिघोरे, अमिषा कांदोर, मनिषा दिघोरे आसाराम प्रधान, दीनेश आठोळे, केशव ठाकरे, तातोबा भोयर, अजय गुरनुले, चद्रकांत दोनाडकर, प्रामुख्याने उपस्थीत होते. अध्यक्षस्थानावरून बोलतांना नंदू नाकतोडे म्हणाले की, मागे नाटकाच्या कायक्रमात युवकांकडे रक्तदान करण्याचे आव्हान केले आणि या विनंतीला मान्य करुन शिवजयंतीचे निमित्य आयोजन करून त्यांनी ते सत्यात उतरवल याच समाधान व्यक्त केले. 

खेडया पाडयातील युवकांनी अशाच प्रकारे एकत्र येऊन सामाजीक उपक्रम घेन्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक चंद्रशेखर प्रधान व आभार अजय गुरनुले यांनी मानले.

संपूर्ण गावाला महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशवितेसाठी राकेश नंदनवार, नेताजी गडे, स्वप्निल गुरूनुले, रोशन वाघाडे, अमित दिघोरे, अमोल गुरनुले, निकेश बांडे, विनोद गुरनुले, समीर गुरनुले, मोहित गुरनुले, प्रवीण होकम, भगवान बांडे, सोमेश्वर कुंभरे, मयूर गुरनुले, अनिकेत दिघोरे, टोनील मते, नितेश मडावी, सुभाष बावणे, रोशन भोयर, उताराम दिघोरे, सचिन चहांदे, रोशन चहांदे, साहिल बगमारे, सुजल प्रधान, कृष्णा दुपारे, अभिषेक पुसाम, डीडी पुसाम, चेतन पुसाम, रुपेश गुरनुले, विवेक गुणुले, आर्यन टेकाम, अविनाश सयाम, अमित कोसरे यानी सहकार्य केले.

  Print


News - Gadchiroli
Related Photos