आचारसंहितेमुळे लोकशाही दिन सभा रद्द


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : सर्व जनतेस सूचित करण्यात येते की, शासन परिपत्रक नुसार दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन सभेचे आयोजन करण्यात येत होते. परंतु भारत निवडणूक आयोगाच्या २२ सप्टेंबर, २०२६ रोजीच्या प्रेस नोट व्दारे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची व्दिवार्षिक निवडणुक आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे.
शासन परिपत्रक २६ सप्टेंबर २०१२ मधिल तरतुदीनुसार ज्या-ज्या क्षेत्रांमध्ये निवडणुकीकरिता आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे, अशा ठिकाणी त्या स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येऊ नये असे नमुद आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू राहिल तोपर्यत जिल्हाधिकारी स्तरावर लोकशाही दिन सभेचे आयोजन करण्यात येणार नाही. तरी, आदर्श आचारसंहिता संपताच शासन परिपत्रक नुसार पुनश्चः लोकशाही दिन सभेचे आयोजन करण्यात येईल. असे तहसिलदार (संगायो), जिल्हधिकारी कार्यालय, गडचिरोली यांनी कळविले आहे.




Petrol Price




