महत्वाच्या बातम्या

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना व Aim अकॅडमी यांच्या वतीने स्पर्धा परीक्षेचे आयोजन


- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यानीं घेतला उस्फूर्त सहभाग

विदर्भ न्यूज एक्सप्रेस                                                                                          

शहर प्रतिनिधी / देसाईगंज : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस बाळासाहेबांची शिवसेना पक्ष गडचिरोलीच्या वतीने सेवादिन म्हणून साजरा करण्यात आला. या सेवादीन उपक्रमांतर्गत 9 फेब्रुवारीला पोलिस भरती व इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Aim स्पर्धा परिक्षा केंद्र गडचिरोली च्या सहकार्याने गडचिरोली येथील MIDC मैदानावर स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. तत्पूर्वी aim अकॅडमी गडचिरोली च्या स्पर्धा परीक्षा केंद्रात परीक्षेसाठी उपस्थित विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना गडचिरोली सह संपर्क प्रमुख हेमंत जम्बेवार, जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, महीला जिल्हाप्रमुख अमिता मडावी, युवा सेना जिल्हाप्रमुख दीपक भारसाकडे, चामोर्शी तालुका प्रमुख पप्पीभाऊ पठाण, गडचिरोली महिला शहराध्यक्ष निता वडेट्टीवार व aim अकॅडमी चे संचालक अभिजित मोहूर्ले उपस्थित होते.

यावेळी सहसंपर्क प्रमुख हेमंत जम्बेवार यांनी मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यानी स्पर्धा परीक्षेची अतिशय जिद्दीने व कष्टाने तयारी करावी व जीवनात यशोशिखर गाठावे असे सांगितले, तर जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी गडचिरोली जिल्ह्यांतील विद्यार्थ्यानी स्पर्धा परीक्षेची योग्य तयारी करून मोठे अधिकारी व इतर शासकीय सेवेत दाखल होवून आपल्या जिल्ह्याचे नावलौकीक करावे व समाजाची तळमळीने सेवा करावी असे सांगीतले, यावेळी उपस्थित विद्यार्थांना aim अकॅडमीचे संचालक अभिजित मोहुर्ले यांनी उपस्थित विद्यार्थांना मार्गदर्शन केेले, तसेच कार्यक्रमाचे संचालन गुलशनकुमार चापले यांनी केले.

MIDC मैदानावर पोलिस भरती, तलाठी, वनरक्षक व ईतर परीक्षेची तयारी करणाऱ्या हजार ते दीड हजार विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा दिली. या स्पर्धा परीक्षेसाठी जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे यांचेकडून प्रथम बक्षीस 15555, द्वितीय बक्षीस 9999, तृतीय बक्षीस 7777 रुपये, आणि 15 विद्यार्थांना प्रो्साहन बक्षीस म्हणून 500 रुपये आणि दहा हजार रुपयांची शिल्ड बक्षीस म्हणून ठेवण्यात आले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos