महत्वाच्या बातम्या

 नाफेड प्रथमच बाजार भावात खरेदी करणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : नाफेडच्या वतीने पीएसएफ योजनेंतर्गत पणन महासंघाच्या संस्थांकडून खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात ५ खरेदी केद्रांना परवानगी मिळाली आहे. विशेष म्हणजे शासन यंदा प्रथमच हमी भागात नव्हे तर बाजारभावात तूर खरेदी करणार असल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.

नाफेड अंतर्गत तूर खरेदीसाठी जिल्ह्यातील काटोल, नरखेड, कुही भिवापूर केंद्रांना परवानगी देण्यात आली असून शेतकऱ्यांनी नावनोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जास्तीत जास्त जास्त शेतकऱ्यांची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी आर.व्ही. तराळे यांनी केले आहे.

खरीप पिकांचे भरडधान्याचा बाजारभाव हमी भावापेक्षा जास्त असल्याने ज्वारी, मका आणि बाजरीच्या शासकीय खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती. शासनाने आता खरीप कडधान्य हमीभावापेक्षा बाजर भावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे  शेतकऱ्यांना लाभ होईल आणि व्यापाऱ्यांमध्ये चुरस निर्माण होईल व शेतकऱ्यांचा फायदा होईल. तुरीचा हमीभाव शासनाने ७ हजार रुपये प्रती क्विंटल जाहीर केला आहे. बाजारात मात्र तूर ८ हजार रुपयांपेक्षा जास्त भावने खरेदी केली जात आहे. शेतकऱ्यांची खरेदीसाठी नोंद झाली असेल तर त्यांनी इतर कागदपत्रे देण्याऐवजी फक्त पिकपेरा असलेला सातबारा उतारा जोडावा लागणार आहे. नवीन शेतकऱ्यांना मात्र आधार कार्ड अचूक बँक खाते आणि ऑनलाईन पिकपेरा असलेला साताबारा उतारा जोडणे आवश्यक असेल.

यावर्षी नाफेड दररोज बाजार भाव सकाळी खरेदी केंद्राना कळवेल, त्याच दराने तूर खरेदी केली जाणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंद करुन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos