अहेरी तालुका काँग्रेस कमिटी बूथ पदाधिकारी मेळाव्याला काँग्रेसचे नेते अजय कंकडालवार यांची उपस्थिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रातील भामरागड अहेरी येथील काल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी बूथ पदाधिकारी मेळावा कार्यक्रम संपन्न झाली आहे. या मेळाव्याला जिल्ह्यातील व विधानसभातील काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हाजरी घेतली आहे.
आगामी लोकसभा- विधानसभा निवडून जिंकून काँग्रेस पक्षाची जिल्ह्यात एकहाती सत्ता आणण्यायाकरिता अहेरी तालुका काँग्रेस कमिटी बूथ पदाधिकारी मेळावा संपन्न झाला. यावेळी नियोजनबद्दल एक दिलाने कार्य करण्याच्या सूचना आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार आणि गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, माजी आम. डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार पेंटाराम तलांडी, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडलावार, महिला काँग्रेस प्रदेश सचिव डॉ. चंदा कोडवते, महिला काँग्रेस अध्यक्ष कविता मोहरकर, काँग्रेस नेते हसनल गिलानी, नगरपंचायत अध्यक्ष रोजा करपेत अनु. जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, आदिवासी सेल अध्यक्ष हनुमंत मडावी, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, अहेरी तालुकाध्यक्ष डॉ. अब्दुल (पप्पू) हकीम, सगुणा तलांडी, मुस्ताक हकीम, निता तलांडी, अशोक येलमुले, रज्जाक पठाण, बबलू शडमेक, अजय नैताम, माजी उपसरपंच कार्तिक तोगम, नगरपंचायत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, अरुण बेज्जलवार, प्रमोद आत्राम, सुनीता कुसनाके, भास्कर तलाडे, स्वप्नील मडावी, सचिन पंचार्यसह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
News - Gadchiroli