महत्वाच्या बातम्या

 बजेट मध्ये निराधार पेन्शन वाढवावी : ज्येष्ठ शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर : महाराष्ट्र सरकारने येणाऱ्या बजेट मध्ये निराधार पेन्शन १००० ची रक्कम वाढवून ५००० करण्याची विनंती शिक्षणतज्ञ, साहित्यिक हेरंब कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे केली आहे. वृध्द, विधवा, निराधार पेन्शन गेली अनेक वर्षे १००० रू म्हणजे दिवसाला ३३ रुपये मिळतात. राज्यात या योजनेचे जवळपास ५० लाख लाभार्थी आहेत. शासनाच्या योजना दिसताना कल्याणकारी आहे पण ते लाभार्थी पर्यंत पोहचू देत नाही. संजय गांधी निराधार योजना गरिबासाठी उपकारक आहे.

अनेक निराधार कुटुंबांना त्याचा आधार मिळतो. या योजनेतल्या त्रुटी कितीतरी गरिबांना दूर ठेवतात. उत्पन्नाची अट २१,००० रुपये आहे. ३६५ दिवसात २१,००० रुपये इतके म्हणजे दिवसात ५८ रुपये होतात. एखाद्या योजनेसाठी इतके कमी उत्पन्न म्हणजे किती हास्यास्पद आहे. यामुळे या योजनेतील अनेक गरजू लाभ घेऊ शकत नाही. या योजनेची रक्कम सुध्दा अत्यंत तुटपुंजी असून महिन्याला फक्त १००० मिळतो. १९८२ साली ही पेन्शन माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संजय गांधीच्या नावाने सुरू केली होती तेव्हा ३६ रुपये मिळत होते.

तर आज जवळपास ४० वर्षात १००० इतकी कमी पेन्शन वाढली आहे. तर सरकारी नोकरांची पगार त्या मानाने किती तरी पटीने वाढले आहेत. त्यामुळे ही रक्कम वाढवावी म्हणून सामाजिक कार्यकर्ते महेश पवार आणि शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी प्रसिद्ध कायदे अभ्यासक असीम सरोदे व स्मिता सिंगलकर यांच्या मार्गदरशनाखाली याचिका दाखल केली आहे. त्यात किमान ५००० रुपये पेन्शन व दरवर्षी ५०० रुपये वाढ करावी अशी मागणी एका पत्राद्वारे केली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos