महत्वाच्या बातम्या

 कोरचीच्या नवोदय परीक्षा केंद्रावर गडचिरोली जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आयुषी सिंह यांची आकस्मिक भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची : गडचिरोली जिल्ह्यातील उत्तर टोकावर वसलेल्या अतिसंवेदनशील कोरची येथे जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश निवड चाचणी परीक्षामधील कोरची येथील दोन परीक्षा केंद्रावर शनिवारी पहिल्यांदाच गडचिरोली जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आयुषी सिंह यांनी दुपारी १२ :३० वाजता दरम्यान परीक्षा सुरू असतांना आकस्मिक भेट देऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची पाहणी केली. ही परीक्षा सकाळी ११:३० ते ०१ :३० अशी दोन तासाच्या वेळात घेण्यात आली आहे.

श्रीराम विद्यालय आणि शासकीय आश्रम शाळा या दोन केंद्रावर सूर असलेल्या नवोदय परीक्षेत कुठल्याही प्रकारचे कॉपी प्रकरण किंवा अनुचित प्रकार दिसून आले नाही त्यामुळे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी परीक्षा केंद्रातील केंद्र संचालक नंदकुमार गोबाडे, अतिरिक्त संचालक बिदूर अधिकारी, आश्रमशाळा प्राचार्य उमाकांत ढोक आणि उपस्थित सर्व पर्यवेक्षकांचे काम बघून समाधान व्यक्त केला आहे. यावेळी कोरची गटसाधन केंद्रातील गट शिक्षणाधिकारी अमित दास सुद्धा उपस्थित होते.

दरवर्षी कोरची तालुक्यातील ५ व्या वर्गामधील शेकडो विद्यार्थी घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी ही चाचणी परीक्षा देतात. यावेळी श्रीराम विघालयात २०६ विद्यार्थी तर शासकीय आश्रम शाळेत ९६ असे एकूण ३०२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. यासाठी कोरची येथील गट गटशिक्षणाधिकारी अमित दास यांनी परीक्षेत कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार किंवा कॉपी प्रकरण होऊ नये तसेच कॉपीमुक्त केंद्र करण्याबाबत गडचिरोली मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या निर्देशानुसार दोन पथके नियुक्त केली होती त्यामध्ये केंद्रप्रमुख डी बी करंबे, वि सा व्य शिवाजी वाघमारे, केंद्रप्रमुख आर के परशुरामकर, वि सा व्य कु. एम आर सहारे हे नियुक्त होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos