पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी आल्लापल्ली येथील आय्यप्पा स्वामी मंदिराचे घेतले दर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : दरवर्षी प्रमाणे यंदाही आल्लापली येथे आय्यप्पा स्वामी मंदिर येथे महापडीपूजा तथा अग्निगुंडम कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यानिमित्याने राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी आय्यप्पा स्वामी पूजेला उपस्थित राहून दर्शन घेतले. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आलापल्ली येथील आय्यप्पा स्वामी मंदिर येते मोठ्या उत्साहात पार पडले.
यावेळी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी आय्यप्पा स्वामी मंदिरात जाऊन आय्यप्पा स्वामीला साकडे घातले व गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सुख शांती व उत्तम आरोग्य लाभावे, अशी आय्यप्पा स्वामी कडे प्रार्थना केले.
यावेळी भाजपचे पदाधिकारी व आय्यप्पा स्वामी भक्ताजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli