महत्वाच्या बातम्या

 वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार : मोहर्ली वनपरिक्षेत्रातील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : मोहर्ली वनपरिक्षेत्रातील मोहर्ली बिटात बांबू तोडण्याकरिता गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.

नीलकंठ नन्नावरे वय ५९ रा. मोहर्ली असे मृताचे नाव आहे. नीलकंठ नन्नावरे हे आपल्या सहकाऱ्यासोबत मोहर्ली वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ८७४ मध्ये शेतात लावण्यात येणाऱ्या कुंपणाकरिता बांबू तोडण्यासाठी गेले होते. त्याच परिसरात वाघ शिकारीकरिता दबा धरून बसला होता. काही कळायच्या आत वाघाने नीलकंठवर हल्ला करून त्याला जागीच ठार केले.

घटनेची माहिती मिळताच मोहर्ली वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. तात्काळ मदत म्हणून मृतकाची पत्नी लता नन्नावरे यांना वनविभागाकडून ५० हजार रुपये देण्यात आले. घटना परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत. सदर घटनेचा पुढील तपास येथील वनपरिक्षेत्र अधिकारी थिपे करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos