महत्वाच्या बातम्या

 सिंगल सिगारेटच्या विक्रीवर बंदी येणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वुत्तसंस्था / मुंबई : देशातील सिंगल सिगारेटच्या विक्रीवर लवकरच बंदी येण्याची शक्यता आहे. तंबाखूच्या सेवनामुळे देशातील कॅन्सरग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर संसदीय स्थायी समितीने सिंगल सिगारेटच्या विक्रीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव दिला आहे. तंबाखू नियंत्रण मोहिमेसाठी हे फायद्याचे ठरू शकते, असेही समितीने म्हटले आहे. तंबाखू उत्पादन आणि मद्य सेवनावर बंदी आणावी, अशी शिफारस संसदीय समितीने करतानाच सिंगल सिगरेटच्या विक्रीवर बंदी घालावी, असे म्हटले आहे. सिंगल सिगारेटच्या विक्रीमुळे त्याच्या विक्रीत वाढ होत आहे. तसेच विमानतळावरचे स्मोकिंग झोन बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे. जीएसटी लागू झाल्यानंतरही तंबाखू उत्पादनावरील करात मोठी वाढ झालेली नाही. त्यामुळे अर्थसंकल्पात तंबाखू जन्य पदार्थांवरील करात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान गुटखा, सुगंधी तंबाखू आणि माऊथ प्रेशनरच्या नावाखाली विकल्या जाणाऱया उत्पादनांच्या विक्रीतून मिळणाऱया कराची रक्कम कॅन्सर पीडितांच्या उपचारावर आणि जनजागृतीसाठी खर्च केली जाणार आहे. देशात तंबाखू उत्पादनांवरील टॅक्स वाढवल्यास त्याच्या विक्रीत ६१ टक्क्यांपर्यंत घट होईल, असा अंदाज आहे.





  Print






News - Rajy




Related Photos