वेकोलि नवनिर्मित स्टेडियमला छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम नाव देण्याची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील नवनिर्मित स्टेडियमला श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम असे नाव देण्यात यावे, यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वतीने देण्यात आलेले पत्र बल्लारपूर क्षेत्राचे महाव्यवस्थापक ठाकरे यांना सुपूर्द करण्यात आले.
यावेळी झालेल्या चर्चेत महाव्यवस्थापक ठाकरे यांनी स्टेडियमच्या नामकरणास सकारात्मक प्रतिसाद देत सहमती दर्शविली. तसेच मैदानाचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. त्यामुळे येत्या काळात हे मैदान बालक, युवा तसेच सर्व क्रीडाप्रेमींसाठी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने उभारण्यात येणारे हे मैदान परिसरातील क्रीडाप्रेमींसाठी प्रेरणास्थान ठरणार असून, येणाऱ्या पिढ्यांतील खेळाडूंच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
निवेदन देताना भाजपा दक्षिण भारतीय आघाडी चे माजी जिल्हाध्यक्ष मनीष रामिल्ला, टीपीएल अध्यक्ष कृष्ण नामसानी, महामंत्री नरसिंग भूपेल्ली, श्रवण मोग्राम यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.




Petrol Price




